Take a fresh look at your lifestyle.

VIRAL VIDEO : “पापाची परी स्कुटीवरून स्वतःच पडली अन् मागच्या बाईकस्वारावर चिडली !”

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – VIRAL VIDEO सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल याचा काही नेम नाही. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सगळीकडे या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरूण-तरूणी स्कुटीवरून प्रवास करताना दिसून येत आहेत. अचानक त्यांच्या स्कुटीचा अपघात होतो आणि यात ते दोघेही स्कुटीवरून रस्त्यावर पडतात.

वडिलांनी स्वप्नात दिली खजिन्याची माहिती, मुलाला सापडली 4 कोटींची चोरी

अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी सावधपणे वाहन चालवणे गरजेचे आहे. असे म्हणतात की रस्त्यावरील अपघात नेहमीच समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे होतात, कारण कोणीही आपली चूक कधीच मान्य करत नाही. नेमंक असंच काहीसं घडलंय या व्हिडीओमधल्या तरूणीसोबत. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

१ रुपयाही अतिरिक्त न देता मोफत घ्या Prime Video, Hotstar, Netflix चा आनंद; पाहा Jio चा भन्नाट प्लान

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी आणि एक तरूण स्कूटीवरून जात असताना अचानक त्यांचा तोल बिघडला आणि ते दोघे रस्त्याच्या मधोमध पडतात. पाठीमागून येणारा बाईकस्वार त्यांच्यापासून थोड्या अंतरावर आपली गाडी थांबवतो आणि घटना पाहू लागतो. मग ती महिला त्या व्यक्तीशी भांडू लागते आणि म्हणते की त्याच्यामुळे स्कुटीचा अपघात घडला. तरूण म्हणतो की, “माझ्या गाडीने स्कुटीला स्पर्शही केला नाही, तर महिलेने उत्तर दिले की ती स्वतःहून पडू शकत नाही! त्यानंतर त्या व्यक्तीने तिला व्हिडीओ दाखवायला. यानंतरही मुलगी त्याच्याशी जबरदस्तीने वाद घालू लागली.

हा व्हिडीओ KumaarSaagar नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ भोपाळमधला असल्याचं सांगण्यात येतंय. सोशल मीडियावर लोक समाधान व्यक्त करत आहेत की त्या व्यक्तीकडे एक कॅमेरा होता ज्यातून ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली होती, अन्यथा तोही खोट्या प्रकरणात अडकला असता.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात महत्वाचे बदल, ‘हे’ आहेत नवीन नियम

दोन्ही बाजूच्या लोकांनी हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत नेलं नाही. वाद घातल्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गाला निघून गेले. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.