Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२२ – रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरतोय फेल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये सीएसकेकडून 23 रननं पराभव झाला. आरसीबीचा या स्पर्धेतील तिसरा पराभव आहे. सीएकेनं दिलेलं 217 रनचं आव्हान आरसीबीला पूर्ण करता आलं नाही. त्यांनी 9 आऊट 193 रन केले. आरसीबीला मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना माजी कॅप्टन विराट कोहलीकडून (Virat Kohli) मोठी अपेक्षा होती. पण, विराटनं साफ निराशा केली. तो फक्त 1 रन करून नवोदीत मुकेश चौधरीच्या बॉलिंगवर आऊट झाला.

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

विराट कोहली यापूर्वी केकेआर विरूद्ध 12 तर राजस्थान रॉयल्स विरूद्ध फक्त 5 रन काढून आऊट झाला होती. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्ध 48 आणि पंजाब किंग्ज विरूद्ध 41 रनची खेळी केली होती. विराटनं 5 इनिंगमध्ये 107 रन केले असून तीनवेळा त्याला 20 पेक्षा जास्त रन करता आलेले नाहीत.

विराट कोहली मागील आयपीएल सिझनमध्येही खास कमाल करू शकला नव्हता. त्यानं 15 मॅचमध्ये 29 च्या सरासरीनं 405 रन केले होते. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. तसंच त्याचा स्ट्राईक रेट 119 होता. हा विराट कोहलीचा तीन सिझनमधील सर्वात कमी स्कोर होता. यापूर्वी 2017 साली त्यानं 308 रन केले होते. एका सिझनमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्डही विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यानं आयपीएल 2016 मध्ये 81 च्या सरासरीनं 973 रन केले होते. त्यानंतर एकाही सिझनमध्ये विराटनं 600 रन केलेले नाहीत.

मनसेची नवी खेळी; आता ‘या’ परवानगीवरून होणार शिवसेनेची गोची

विराट फक्त आयपीएलमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. त्यानं आंतरराष्ट्रीय शतक झळकावून आता दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. श्रीलंका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्याला शतक झळकावण्यात अपयश आले. यापूर्वी टी20 मालिकेतही तो मोठी खेळी करू शकला नव्हता. टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर असलेल्या विराटनं बॅटींगवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी टीम इंडियाच्या दोन प्रकारातील आणि आरसीबी टीमची कॅप्टनसी सोडली. त्यानंतरही त्याच्या खेळात सुधारणा झालेली नाही. आगामी टी20 वर्ल्ड कपचा विचार करता विराटचा हा फॉर्म रोहित शर्माची काळजी वाढवणारा आहे.

थेट मुलाखतीद्वारे मिळवा ‘या’ जिल्ह्यात नोकरीची संधी; असा करा अर्ज

Leave A Reply

Your email address will not be published.