Take a fresh look at your lifestyle.

Vivo कंपनीचे संचालक भारतातून फरार; ED च्या छाप्यानंतर आतापर्यंत काय घडलं?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – चीनकडून नेहमीच भारतावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. भारताने आजवर समजदारीची भूमिका घेतली असली तरी पूर्व लडाख भागात दोन वर्षांपूर्वी चिनी अतिक्रमण सुरू झाल्यापासून भारताची भूमिका कठोर झाली आहे. आता भारत चीनची कोणतीही चूक माफ करण्याच्या मनस्थितीत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी चीनचे अनेक ऍप्स भारतात बॅन करण्यात आहे. त्याच पार्श्ववभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोबाईल कंपनी Vivo सह अनेक चिनी कंपन्यांवर छापे टाकले (ED Action Against Chinese Companies).

‘मातोश्री’वरून बोलावलं तर एकनाथ शिंदेंसह जाणार; सेनेच्या ‘या’ बंडखोर आमदाराचं वक्तव्य

देशातील 22 राज्यात असलेल्या 44 ठिकाणांवर टाकलेल्या या छाप्यामुळे चिनी कंपन्यांमध्ये घबराट पसरली असून काही संचालक भारतातून पळून गेले आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रं ताब्यात घेऊन कंपन्यांच्या कामकाजाच्या पद्धतीची कसून चौकशी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील Vivo कंपनीच्या सोलन प्लांटमध्ये काम करणारे दोन चिनी संचालक ईडीच्या छाप्यामुळे इतके घाबरले की त्यांनी देश सोडून पळ काढला. ईडीने कंपनी आणि कंपनीच्या संचालकांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अशा स्थितीत कंपनीच्या संचालकांना अटक होण्याची भीती होती. हे पाहून ते गुपचूप आपल्या देशात पळून गेले.

शिंदे सरकारचा राऊतांना दणका, किरीट सोमय्यांना दिलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा पैसा चीनला सुनियोजित पद्धतीने पाठवण्याचं रॅकेट अनेक दिवसांपासून सुरू होतं. त्यासाठी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने चिनी नागरिकांना भारतात कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले. त्यानंतर हळूहळू कंपनीचे पैसे बेकायदेशीरपणे बाहेर आणले गेले. तपासाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ईडीच्या तपासात आतापर्यंत 10 हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगची माहिती मिळाली आहे. म्हणजेच एवढा पैसा चुकीच्या पद्धतीने देशाबाहेर पाठवण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.