Take a fresh look at your lifestyle.

Vodafone-idea चा डबल धमाका, दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन केले लाँच

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – तुम्ही जर वोडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आयपीएलचा (IPL) पंधरावा हंगाम सुरू झाल्यानंतर Vodafone-idea ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन लॉंच केले आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार (Disney+ Hotstar) चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. नेमके कोणते आहे हे प्लॅन यामधून आणखी काय बेनिफिट्स मिळेल? जाणून घेऊयात थोडक्यात…

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सध्या आयपीएल 2022 चा (IPL) पंधरावा हंगाम सुरू झाला आहे. आणि अशा परिस्थितीत अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपआपल्या ग्राहकांसाठी नवे प्लॅन लॉंच केले आहे. मात्र असं असलं तरीही वोडाफोन आयडीयाचे प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खास असल्याचं ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा –  आताच खरेदी करा सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक स्प्लेंडर ; सिंगल चार्जमध्ये तब्बल १८० KM पर्यंत रेंज!

VI चा Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन

तसं पाहता याआधी VI कंपनीकडे असे क्रिकेटचे तीन जुने प्लॅन होते. मात्र आता कंपनीने आणखी एक प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन 499 रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिली जाईल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज दिले जात आहेत.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर; पहिल्या दहामध्ये भारतातील 4 शहरं

VI चा 1066 रुपयांचा प्लॅन

Vodafone-idea ने दुसरा लॉंच केलेला प्लॅन हा 1066 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जाईल. हा प्लॅन महागडा असला तरी त्याची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये 499 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, 1 वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जात आहे. या दोन्ही योजनांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight सारखी वैशिष्ट्ये आहेत.

हेही वाचा –  धक्कादायक! बारावीच्या इंग्रजी पेपरची चक्क ५०० रुपयांना विक्री; तब्बल २४ जिल्ह्यातील परीक्षा रद्द होणार!

VI चे जुने Disney+ Hotstar प्लॅन

दरम्यान, यापूर्वी, VI कडे क्रिकेटचे तीन जुने प्लॅन होते. या प्लॅनची किंमत अनुक्रमे 601, 901 रुपये आणि 3099 रुपये इतकी होती. हे तीनही प्लॅन Disney + Hotstar अ‍ॅक्सेससह आले होते. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 28 दिवस, 70 दिवस आणि 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासह 16GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटासह 48GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. तर ₹ 3999 च्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज फक्त 1.5 GB डेटा मिळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.