Take a fresh look at your lifestyle.

BREAKING NEWS – BCCI चा मोठा निर्णय! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ दिग्गज कोचची घोषणा

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : BREAKING NEWS – सध्या क्रिकेट आयपीएल 2022 चा १५वा सिझन जोरात सुरु आहे. त्यानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. दरम्यान, या मालिकेनंतर टीम इंडियाला इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा करण्याचं नियोजन ठरलेलं आहे. अशातच चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे संघ तयार केले जाणार असून आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने चक्क नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

मोठी बातमी! उद्यापासून बदलत आहेत इनकम टॅक्‍सचे नियम, व्यवहार करण्यापूर्वी ‘या’बाबी जाणून घ्या

या दिग्गजावर मोठी जबाबदारी
आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडिया 26 जून ते 28 जून या तारखेदरम्यान खेळणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे म्हणजेच एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर संघासोबत जाणार आहेत. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सांगितले की लक्ष्मण संघासोबत डब्लिनला जाणार आहेत.

मोठी बातमी! ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा; वाचा सविस्तर

2 संघ एकत्र दौरा करतील
भारताचा आयर्लंड दौरा 26 जूनपासून सुरू होणार आहे, तर टीम इंडियाला 1 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध पाचवी आणि अंतिम कसोटी खेळायची आहे. या वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी, भारतीय क्रिकेट बोर्डाने 47 वर्षीय लक्ष्मण (VVS लक्ष्मण) यांची NCA च्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली होती. राहुल द्रविडचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.

रेशनच्या नियमांमध्ये झालेले मोठे बदल जाणून घ्या; जूनपासून लागू होणार बदल

यापूर्वीही टीम इंडियामध्ये 2 प्रशिक्षक
गेल्या वर्षीही टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती, त्यावेळी एनसीएचे तत्कालीन प्रमुख द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासह श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळला. यावेळी राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे ही जबाबदारी आली आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अजून घोषणा व्हायची आहे, त्यामुळे या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडू संघात स्थान मिळू शकते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.