Take a fresh look at your lifestyle.

पाणपोईसारखे उपक्रम ही पारमार्थिक सेवा : मंडलिक महाराज

0
maher

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासे : .पाणपोईसारखे उपक्रम ही पारमार्थिक सेवा कार्यच असल्याचे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले. श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदिराच्यावतीने भाविक व पादचाऱ्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली .मंदिराचे मार्गदर्शक मंडलिक महाराज यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.

उन्हाळ्याची चाहूल लागताच पादचारी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री खोलेश्वर गणपती मंदिर देवस्थानने पुढाकार घेऊन राबविलेला पाणपोईसारखा उपक्रम स्तुत्य असून पाणपोई सारखे उपक्रम सुरू करणे हे पारमार्थिक सेवा कार्यच असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. पाणपोई उदघाटन प्रसंगी श्री खोलेश्वर गणपती मंदिरांचे विश्वस्त रामभाऊ जगताप, सुनील वाघ, कापड व्यापारी सुभाष पाटील कडु, नामदेव कुटे पाटील, नानासाहेब जाधव, राजेंद्र परदेशी, विजय गांधी, प्रल्हाद सुडके आदी उपस्थित होते. नगरसेवक वाघ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.