Take a fresh look at your lifestyle.

Weather Alert : महाराष्ट्राला IMD कडून येलो अलर्ट, या विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Weather Alert अखेर आज मान्सूनचे राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली.

सिबिल स्कोअर म्हणजे काय? कर्जासाठी अत्यंत महत्वाचा असणारा सिबिल स्कोअर कसा वाढवायचा?

गुरुवारपासून शनिवारी सकाळपर्यंत उपनगरात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, सांताक्रूझ वेधशाळेत १५.५५ मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबात पाऊस झालाच नाही. पण वीकेंडसाठी, IMD ने शहरासाठी येलो इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मिळणार मोफत स्कूटी

हवामान खात्याने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, संपूर्ण गोवा, कोकणातील काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात पुढे सरकला आहे. तर मुंबईवर मान्सूनची अधिकृत सुरुवात ११ जूनला झाली आहे.

शहरात नोंद झालेल्या पावसामुळे रात्रीचे तापमान ३० अंशांच्या जवळ पोहोचले होते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रूझ वेधशाळेत शुक्रवारी किमान तापमान २५ अंश नोंदवले गेले तर कुलाबा येथील वेधशाळेत २६.७ अंश नोंदवले गेले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.