Take a fresh look at your lifestyle.

विदर्भात उन्हाचा कडाका वाढला, अकोल्यात ४२.९ तर नागपुरात ४०.९ तापमानाची नोंद

0
maher

गिरीश कुबडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर – मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात तापमानाचा पारा चढायला सुरूवात झाली आहे. अशातच विदर्भातील बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यत पोहचलं आहे. अक्षरश: एप्रिल महिन्याप्रमाणे दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका जाणवू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळलं आहे. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नागपुरात पारा ४०.९ अंश सेल्सिअसवर गेला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

शुक्रवार प्रमाणे शनिवारी देखील अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात कमाल ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २४ तासांतच पाऱ्यामध्ये १.३ अंशांची वाढ झाली. किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस इतके होते. नागपुरात सकाळपासून वातावरण कोरडे होते. सकाळी आर्द्रता ४० टक्के होती, जी सायंकाळी घसरून २१ टक्क्यांवर पोहोचली. विदर्भात अकोल्यापाठोपाठ वाशिम येथे ४१.५ तर वर्धा येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा – भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे ढग, येत्या 3 तासात ‘या’ जिल्ह्यात बरसणार सरी!

येणाऱ्या दिवसात उष्णतेत वाढ

उष्ण वारे व सूर्यकिरणांनी नागपुरकरांचा त्रास वाढला आहे. सध्या राजस्थान व गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांच्या वरच असेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.