Take a fresh look at your lifestyle.

भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे ढग, येत्या 3 तासात ‘या’ जिल्ह्यात बरसणार सरी!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पुढील दोन नागरिकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दरम्यान, एकीकडे राज्यातील तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार?

हेही वाचा – “‘ते’ व्हिडीओ काढा अन्यथा…”, आता रशियाची थेट गुगलला धमकी!

हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन तासात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. तर पुण्यासह सातारा आणि घाट परिसरात देखील तुरळक ठिकाणी सरी बरसणार आहेत.

हेही वाचा – एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार? जयंत पाटील स्पष्टच बोलले!

हवामान खात्याने जारी केलेल्या नवीन सॅटेलाइट इमेजनुसार, संबंधित परिसरात अवकाळी पावसाचे दाट ढग आढळले आहेत. त्यामुळे येत्या काही तासात याठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

7 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

हेही वाचा – 🏏टी-20 विश्वचषकापूर्वीच भारत-पाकिस्तान आमनेसामने, आशिया कपच्या तारखा जाहीर

एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे उष्णतेची लाट असं समिश्र वातावरण सध्या महाराष्ट्रात तयार झालं आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने आज बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.