Take a fresh look at your lifestyle.

हवामान विभागाकडून अलर्ट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचे

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या वातावरणामध्ये झटपट बदल होताना दिसत आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे बंगाल उपसागर तसेच त्या क्षेत्राला लागून असलेल्या भागांना चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबई तसेच ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण आहे. तर राज्यातील काही भागात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र क्षेत्राचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबतच महाराष्ट्रावरही होणार आहे. मात्र, या चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसणार नसून त्यामुळे वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – एसटी संपाबाबत मोठी बातमी, कोर्टाने राज्य सरकारला दिले ‘हे’ निर्देश!

सध्या महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे वातावरण निर्माण झालं आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 23, 24 आणि 25 मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – खुशखबर! CISF मध्ये 249 रिक्त जागांसाठी भरती, तब्बल 81 हजारपर्यंत मिळेल पगार

दरम्यान, या अवकाळी पावसाचा तसेच ढगाळ वातावरणाचा आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. एकीकडे कमालीची उष्णता तर दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.