Take a fresh look at your lifestyle.

पायी मशाल ज्योतीचे जल्लोषात स्वागत

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : गोंडेगावातील जागृत देवस्थान वेडु आई यात्रेनिमित्त गावातील 51 तरुणांनी श्री क्षेत्र येडसी (ता, कळंब, जि उस्मानाबाद) या मुळ ठाण्यावरून आणण्यात आलेल्या पायी मशाल ज्योतीचे श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दरवर्षी भरणाऱ्या गोंडेगावातील पवित्र देवस्थान येडूआई माता देवस्थानची यात्रा या वर्षी 6 व 7 एप्रिल या दिवशी भरणार असून यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीपासूनच उंच काठीची मिरवणूक गोदावरीच्या पवित्र जलाने पवित्र करून गावाच्या शिवावरून मिरवत मंदिरात स्थानबद्ध करण्यात येते. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देण्यात येतो.

यानिमित्त गावात छबिना, कुस्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराजांचे प्रवचन देखील होत असते. विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. गेल्या 12 वर्षापासून गावातील जगदंबा मशाल ग्रुपचे 51 तरुण पंचक्रोशीतील भाविकांना मशाल ज्योतीचे दर्शन व्हावे या हेतूने जगदंबेचे मशाल आणण्याचे निरंतर कार्य सुमारे 12 वर्षांपासून करतात. यापुढेही हे कार्य पुढे चालू राहील अशी माहिती मंडळातील अमोल तांबे, रामा मोरे, राजेंद्र हरगुडे, विजय तांबे, संतोष हरगुडे, अनिल कुऱ्हे, किशोर कुराडे, नवनाथ थोरात, तेजस हुरे, सोमनाथ थोरात ,सागर आमले, नितीन हरगुडे, गणेश जगताप, रवींद्र कुर्हाडे या तरुणानी दिली. श्रीराम मंदिर चौकात दिगंबर जैन समाजाचे वीर सेवा दलचे माजी अध्यक्ष राजू पाटणी, अनिल पांडे, निलेश पांडे, किशोर पांडे यांनी स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.