Take a fresh look at your lifestyle.

‘आनंद दिघेंसोबत काय घडलं, वेळ आल्यावर बोलेन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मालेगाव – मालेगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यात जे जे काय घडलंय. त्याचा मी साक्षीदार असून त्याविषयी मी योग्यवेळी बोलेन, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ‘काही गोष्टी त्यांच्या आणि माझ्यातील आहेत. त्या मी आता बोलणार नाही. जशा गोष्टीसमोर येतील. तसं मलाही तोंड उघडावे लागेल, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

सध्या राज्यात मुलाखतींचा सपाटा सुरूय. पण ज्या दिवशी माझी मुलाखत होईल तेव्हा राजकीय भूकंप होईल. आम्ही क्रांती केली. अन्यायाविरोधात उठाव केला. याची दखल ३३ देशांनी घेतली. मुळापर्यंत न जाता गद्दारीचा शिक्का आमच्यावर मारला. विश्वासघातकी आम्हाला म्हणाला. पण आमची भूमिका लोकांनी स्विकारली हे या गर्दीवरून लक्षात येते, असं शिंदे म्हणाले.

‘आम्ही शिवसेना वाचविण्याचे काम केले.आम्ही जीवाची बाजू लावून सेना मोठी केली. ज्यांच्यासोबत युती करून लढलो, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन न करता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मग विश्वासघात कुणी केला? असा सवालच शिंदेंनी उपस्थितीत केला.

Leave A Reply

Your email address will not be published.