Take a fresh look at your lifestyle.

कॉस्मेटिक सर्जेरीनंतर अभिनेत्रीचा मृत्यू, शरीराची विकृती दूर करणारी कॉस्मेटिक सर्जरी काय आहे? ही सर्जरी किती जोखमीची आहे?

ओटीटी न्यूज नेटवर्क


जगात सगळ्यांनाच सुंदर दिसायच असतं. सुंदर दिसण्याच्या ध्यासामुळे आता जगभरात कॉस्मेटिक सर्जरीचं वेड लागलं. ब्राझील आणि अमेरिकेबरोबरच भारतही कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी सर्वात अग्रेसर आहे. भारतातही सर्जरी करण्याचं वेड आता वाढू लागलं. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेंटींनी सर्जरी केली. कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तिने वजन कमी करण्यासाठी एक सर्जरी करून घेतली. या शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. दरम्यान, कॉस्मेटिक सर्जरी काय असते? ती सर्जरी किती उपयुक्त, किती जोखमीची आहे? याच विषयी जाणून घेण्यासाठी ऑन धीस टाइम मीडियाचा हा लेख नक्की वाचा

केंद्र सरकारची तपास यंत्रणा असलेल्या ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचं पुढे काय होते?

महत्वाच्या बाबी

१. कन्नड अभिनेत्री चेतना राज याचं निधन
२. वजन कमी करण्यासाठी केली होती शस्त्रक्रिया
३. शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतमुळे झाला मृत्यू
४. अनेक सेलिब्रिटीही घेतात कॉस्मेटिक सर्जऱ्यांचा आधार

जगात सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर दिसण्याच्या ध्यासामुळे आता जगभरात कॉस्मेटिक सर्जरीचं वेड लागलं. ब्राझील आणि अमेरिकेबरोबरच भारतही कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी सर्वात अग्रेसर आहे. भारतात आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेंटींनी सर्जरी केली. कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तिने वजन कमी करण्यासाठी एक सर्जरी करून घेतली. या शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. दरम्यान, कॉस्मेटिक 0सर्जरी काय असते? ती सर्जरी किती उपयुक्त, किती जोखमीची आहे? याच विषयी जाणून घेऊ.

आयुष्यात कधीही पैशांची कमी भासणार नाही; फक्त ‘या’ चुका टाळल्या पाहिजेत

कोण आहे चेतना राज?
चेतना ही कन्नड टीव्ही मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिनं अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली होती. चेतनानं अनेक कन्नड मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. चेतनाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

चेतना राजच्या प्रकरणात काय झाले?
चेतना राज या कर्नाटकमधील अभिनेत्रीचा फॅट फ्री सर्जरीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. बंगळुरुमधील खासगी रुग्णालयात तिने ही शस्त्रक्रिया करून घेतली. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार 16 मे रोजीचेतनानं वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे तिच्या फुफ्फुसांत संसर्ग झाला आणि त्यातच तिचं निधन झालं.

कोरोनाचा पुन्हा थैमान! उत्तर कोरियात दोन लाख जणांना संसर्ग

कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय?
प्लास्टिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जन हा साधारणपणे त्वचेचे भाजणे यावर उपचार करतो. कॉस्मेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचाच एक प्रकार आहे. प्लास्टिक सर्जरी सहसा शरीराचा एखादा दोष किंवा विकृती दूर करण्यासाठी केली जाते. याउलट कॉस्मेटिक सर्जरी ही प्रामुख्याने सौंदर्योपचारांचा भाग म्हणून केली जाते. शरीराची त्वचा भाजल्याने झालेल्या जखमा किंवा व्रण दूर करण्यासाठी किंवा कर्करोगासारख्या आजारावरील उपचारांदरम्यान निर्माण झालेले दृष्य दुष्परिणाम करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्या केल्या जाऊ लागल्या. काळाबरोबर त्या तंत्रात झालेल्या विस्तारामुळे आता सौंदर्योपचारातंर्गत अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी केल्या जातात.

कॉस्मेटिक सर्जरी का केल्या जातात?
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॉस्मेटिक सर्जरी या सुंदर दिसण्यासाठी केली जाते. यात स्तनांचे आकार कमी करणे, पोट कमी करणे, नाकाला नवीन आकार देणे, नको असलेले केस काढून टाकणे, ओठांना चांगला आकार देणे या सर्जरी केल्या जातात. थोडक्यात काय तर कॉस्मेटिक सर्जरी हा शस्त्रक्रियेद्वारे केला जाणारा असा प्रकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक ठेवणीमध्ये बदल केले जातात. आजकाल प्रत्येकाला आकर्षक दिसायचं असतं. नैसर्गिक बेढव शरीर सुडौल बनवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतली जाते. या प्रक्रियेतला सर्वज्ञात असलेला प्रकार म्हणजे लिपोसक्शन. यामध्ये शरीरातील अतिरिक्त फॅट शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढलं जातं. फेस लिफ्ट या प्रकारामध्ये बोटॉक्स नावाचं औषध सिरिंजद्वारे देऊन चेहर्‍याच्या पेशींमध्ये लवचिकता आणली जाते. या लवचिकतेमुळे चेहर्‍यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. या सर्जरीद्वारे ओठांचा आकारही बदलत येणं शक्य आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

फॅट फ्री कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय?
शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी सध्याच्या काळात कॉस्मेटिक सर्जरी केली जाते. १८ वर्षांनंतर साधारण ६५ वर्षे वयापर्यंत ही शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करायची त्याच्या विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या आणि तपासण्या करून रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सक्षम असल्यास त्याच्यावर फॅट फ्री शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो. या शस्त्रक्रियेला लिपोसक्शन सर्जरी म्हणूनही ओळखले जाते. लिपोसक्शन म्हणजे जाडी कमी करण्याचं किंवा चरबी कमी करण्याचं ऑपरेशन. त्यामध्ये प्रामुख्याने त्वचेखालील चरबी वितळवणे किंवा काढून टाकणे अशा दोन प्रक्रिया केल्या जातात. इंजेक्शन, अल्ट्रासॉनिक प्रक्रिया आणि लेसर किरणांच्या वापरातून ही प्रक्रिया होते. दरम्यान, डॉक्टरांनी या ऑपरेशनवर गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. लिपोसक्शनमुळे मेदाचे ग्लोब्युल्स फुप्फुसात जाऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात. या ऑपरेशनचा परिणाम दीर्घकाळ राहातो पण त्याचे अनेकदा वाईट परिणामही होतात.

  • कॉस्मेटिक सर्जेरीमध्ये जोखीम किती?

  • लिपोसक्शन किंवा फॅट फ्री सर्जरी ही वजन कमी करण्याचा उपाय नाही. शरीराचा आकार सुडौल करण्यासाठी तिचा वापर केला जातो. वजन कमी करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, चरबी कमी करून शरीर सुडौल करण्याच्या शस्त्रक्रियेचे धोकेही आहेत. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये रूग्णाला एका सेशननंतर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक सेशन्सना तोंड द्यावं लागू शकतं. या शस्त्रक्रियेनंतर शरीराचा भाग काळानिळा होतो. दुखू लागतो. शरीरावर काही व्रण राहण्याची शक्यताही असते. काही वेळा अशा शस्त्रक्रियेनंतर त्वचा सैल पडण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंती हाताळण्याची योग्य तयारी रुग्णालयाकडे नसल्यास रुग्ण दगावण्याचा धोकाही असतो.

बॉलिवूडमधील प्रत्येकाला परफेक्ट दिसण्याची इच्छा असते आणि यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांचा देखील आधार घ्यावा लागतो. बॉलिवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर शस्त्रक्रिया केल्या आहेत.

अभिनेत्री संतापली अन् थेट पाठवले उद्धव ठाकरेंना पत्र; पदाधिकाऱ्यांची केली तक्रार
कोणत्या बॉलिवूड कलाकारांनी केलीय सर्जरी?
१. आपल्या सौंदर्याने बॉलिवूड गाजवणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने देखील तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याची कॉस्मेटिक सर्जरी केली होती.
२. बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही आपले ओठ आणि नाकाची शस्त्रक्रिया केली आहे.
३. अभिनेत्री जान्हवी कपूरने पदार्पणाच्या आधीच नाक आणि हनुवटीची शस्त्रक्रिया केली आहे.
४. आपल्या हॉट अंदाजामुळं लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री वाणी कपूरचंही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. वाणीने हनुवटी, नाक आणि ओठांची कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केली.
५. आपल्या वक्तव्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंतही प्लास्टिक सर्जरीमध्ये पुढे आहे. मीडिया रिपोर्टनुसार राखी सावंतनेही ओठ, ब्रेस्ट आणि नाकाची शस्त्रक्रिया केली आहे.

Comments are closed.