Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार! शिंदे काय निवडणार? भाजपची ऑफर की उद्धव ठाकरेंची साद?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मागच्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या बंडामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी वर्षा बंगल्यावरून निघत मातोश्रीवर (matoshree) जाण्याचे ठरवले यानंतर बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलची सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे.

Breaking News : मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ला जय महाराष्ट्र; आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

एकनाथ शिंदे (eknath shinde Guwahati) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी दोन आमदारांनी तेथून पलायन करत महाराष्ट्र (Maharashtra) गाठले. या सगळ्या घडामोडीत पुढच्या काही तासात राज्याचे भवितव्य समोर येणार आहे. शिवसेनेत (shiv sena) बंडखोरी केलेले एकनाथ शिंद सकाळी 10 वाजता बैठक घेणार आहेत यानंतर पुढच्या एक तासात 11 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लगेच 11.30 वाजता मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. यातीन बैठकीतून काय निष्पण्ण होणार यावर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाकरे सरकारचा खेळ संपला! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पत्र समोर, तब्बल ‘इतक्या’ आमदारांच्या सह्या

एकनाथ शिंदे यांच्या गोटातील 2 आमदारांनी थेट महाराष्ट गाठल्यानंतर ते सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर जे दोन आमदार पलायन करून आले आहेत ते पत्रकार परिषदे काय बोलतील यावरही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याचबरोबर शिवसेनेकडून गुवाहाटीत असलेल्या परत येण्याचे आवाहन ही करण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांत बहुसंख्य आमदारांनी शिंदेंशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेना यापुढे मध्य मुंबईतील उर्वरित आमदारांना एकत्र ठेवणार नसल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर यापुढे ज्यांना शिवसेनेसोबत राहायचे आहे ते राहतील आणि ज्यांना जायचे आहे ते जातीलच, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

पुढचे दोन तास महत्वाचे! मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अन् मंत्रिमंडळाची शेवटची बैठक?

गुवाहाटीतील हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर शिवसेनेच्या बंडेखोर आमदारांच्या बंदोबसत्ता मोठी वाढ करण्यात आली आहे. हॉटेल रेडीसन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा हे बंडखोर आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांचं मनपरिवर्तन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.