Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेचा निकाल कधी लागणार ? ठाकरे-शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील उद्याची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले होते. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उद्या उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली. त्यानंतर तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आता कुणाची ? (Whose Shiv Sena now?) या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे धाव घेत आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र आयोगाने केवळ दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्याची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत असून सुप्रीम कोर्टाची सुनावणीही आता २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.

मुंबईतल्या मंडळांना ‘या’ अटी पाळाव्या लागणार; बीएमसीकडून नियमावली जाहीर

आजची सुनावणी उद्या

तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती सी.टी. रवी कुमार उद्या अनुपस्थित राहणार असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.

गेल्या सुनावणीत, सरन्यायाधीशांनी असे मत व्यक्त केले होते की, या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवादाची आवश्यकता असल्यास, हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे पाठविण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी घटनापीठ स्थापनेबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे राजकीय निरीक्षकांच्या दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे. २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा निवृत्त होत असून, त्यापूर्वी निर्णय होण्याची अपेक्षा शिवसेनेला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.