Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रिप्ट कोणी लिहून दिली? मिटकरींनी लगावला टोला

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून वादळी राजकारण रंगल्याचे दिसून आलं. अखेर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडला. दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची दसरा मेळावा पार पडला. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.

अनुकंपा तत्वावरील प्रचलित धोरणात बदल; बेपत्ता कर्मचाऱ्याच्या वारसास नोकरी मिळणार

या सभेतील भाषणात शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही शिंदे यांनी जोरदार टीका केली. राष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या याच भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरी यांनी भाषणाची स्क्रिप्ट भाजपची असल्याची खिल्ली उडवली आहे.

बचतीसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरते लाभदायक; पंतप्रधानही करतात गुंतवणूक

दसऱ्याच्या दिवशी सकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ट्विटरवर त्यांनी भाजपाचा केमिकल लोच्या झाल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात भाजपला स्थान मिळाले नाही, असा टोला लागवत याकडे मिटकरी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा “केमिकललोच्या” झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की.” असं ट्वीट मिटकरींनी केलं आहे.

शिंदेंची ठाकरेंवर टीका; सत्येच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला मूठमाती

“माननीय मुख्यमंत्री महोदयांचे BKC मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट . या भाषणात नरेंद्रजी मोदी ,RSS व भारतीय जनता पार्टीवर स्तुतीसुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही.” अशी टीकाही मिटकरींनी ट्विटच्या माध्यमातून केली.

आरोप सिद्ध करुन दाखवा : अजित पवार

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.