Take a fresh look at your lifestyle.

Share Market – चार दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजार वधारणार की घसरणार? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे? तज्ज्ञांचं मत काय?

भारतीय शेअर बाजार (Share Market) आज सोमवारी चार दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा उघडणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नक्कीच उत्साही असतील. मात्र या दरम्याना बाजाराचा मूड कसा असेल हेही महत्त्वाचं आहे.

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – भारतीय शेअर बाजार (Share Market) आज सोमवारी चार दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा उघडणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नक्कीच उत्साही असतील. मात्र या दरम्याना बाजाराचा मूड कसा असेल हेही महत्त्वाचं आहे. या आठवड्याची सुरुवात घसरणीने होण्याची अपेक्षा आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आज बाजार जागतिक बाजारासह (Global Market) इतर घटकांच्या दबावाखाली असेल.

अप्लाय करुन देखील PAN Card आलं नाहीय का? असं चेक करा स्टेटस

सेन्सेक्समधील (Sensex) शेवटचा व्यवहार 13 एप्रिल रोजी झाला आणि त्यानंतर चार दिवस व्यापार बंद झाला. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 237 अंकांनी घसरून 58,339 वर बंद झाला, तर निफ्टी 55 अंकांच्या घसरणीसह 17,476 वर बंद झाला. गेल्या आठवड्यात सततच्या घसरणीमुळे निफ्टी 1.7 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. गेल्या आठवड्यात अमेरिकन बाजारही घसरला होता आणि आज उघडणाऱ्या आशियाई बाजारांवर दबाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत भारतीय गुंतवणूकदारांच्या सेंटिमेन्ट्सवरही परिणाम होऊ शकतो.

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर तेथील बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम आहे. प्रमुख एक्सचेंज Nasdaq वर 2.14 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. मात्र युरोपियन बाजारांवर अमेरिकेचा फारसा परिणाम दिसला नाही. युरोपमधील प्रमुख स्टॉक एक्सचेंज, जर्मनीच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 0.62 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय फ्रेंच बाजारात 0.72 टक्के आणि लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये 0.47 टक्क्यांनी उसळी घेतली.

आता मिळणार काही मिनिटात लोन; Google Pay आणि PhonePe चा धमाका

आशियाई बाजारही लाल रंगात उघडले

सोमवारी सकाळी आशियातील सर्व प्रमुख बाजार घसरणीसह व्यवहार करताना दिसून आले. जपानचा निक्केई 1.47 टक्क्यांच्या घसरणीने व्यवहार करत होता. जपानी शेअर बाजारातील व्यवहार तोट्याने सुरू झाले आहेत. याशिवाय दक्षिण कोरियाच्या कॉस्पी स्टॉक एक्सचेंजमध्येही 0.09 टक्क्यांची घसरण झाली. सिंगापूर एक्स्चेंजवर 0.19 टक्के तोटाही आहे.

BREAKING! ६४ सहकारी बँकांसह ८ मोठ्या बँकाही बुडाल्या! केरळसह पंजाब आणि महाराष्ट्र संकटात

 

परदेशी गुंतवणूकदारांनी 2 हजार कोटी काढून घेतले

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, FII ने भारतीय बाजारात 2,061.04 कोटी रुपयांचे शेअर विकले. मात्र या काळात, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आणि बाजारात 1,410.85 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. बाजार स्थिर होईपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांची माघार घेण्याची प्रक्रिया सुरू राहू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.