Take a fresh look at your lifestyle.

दोन महिन्यांत राज्य खड्डेमुक्त होणार?; सचिवांनी दिले आश्वासन

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : दिवसागणिक राज्यातील विविध भागात भीषण अपघात होत आहे याला बेशिस्तपणे वाहन चालविणे हे कारण आहे परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील विविध जिल्ह्यात खड्ड्यांच्या समस्या जीवघेण्या ठरत आहे. अनेक जिल्ह्यात महामार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था आहे. जिल्हा मार्ग तर त्याहूनही वाईट अवस्थेत आहे. नेमका पावसाळा ऋतू सुरु झाला की रस्त्यांच्या समस्येला ऊत येतो यामागील प्रमुख कारण म्हणजे थातुरमातुर व कामचलाऊरित्या केलेली रस्ता दुरुस्ती अथवा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले रस्ते होय. महानगर असो अथवा जिल्हा-तालुका स्तरावरील मार्ग, राज्यातील अनेक मार्ग शेवटच्या घटका मोजत आहे. चाळण झालेल्या रस्त्यावरून वाहन चालवताना गड्डे चुकविण्याच्या नादात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या गंभीर प्रश्नावर अभियंता दिनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागातील अभियंत्यांचे कान टोचले होते व तातडीने चाळण झालेल्या मार्गाची योग्य ती दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.

“शिवसेनेला न्याय मिळाला ही समाधानकारक बाब” – अजित पवार

या कामाचा शुभारंभ करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात कुठलाही जणू मुहूर्तच न मिळाल्याने आता रस्ते दुरुस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. याबाबत अधिक माहिती सार्वजनिक विभागाचे सचिव सतीश साळुंखे यांनी काल दिली. ऑक्टोबर पासून सुरु होणारे रस्ते दुरुस्तीचे काम हे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे लक्ष्य आहे. याअंतर्गत खड्डे भरण्याचे कार्य पूर्ण केले जाणार असून, राज्यातील अनेक मार्गांची डागडुजी केली जाणार आहे. सदर कामासाठी ५०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

दसरा मेळावा : शिंदे गटाला उच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली

सार्वजनिक बांधकाम सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा व महामार्ग मिळून एकूण ९८ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची डागडुजी केली जाणार असून त्यांना खड्डेमुक्त केले जाणार आहे. येत्या काळात म्हणजेच २०२२-२३ अंतर्गत नवीन रस्तेबांधणी करिता नाबार्डकडून ७५० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे. साधारणतः प्रत्येक मार्गावर ३५ ते ४० खड्डे आहेत परंतु त्यांची भीषणता अतिशय जास्त आहे त्यामुळे सुमारे दोन महिन्याच्या कालावधीत राज्य खड्डेमुक्त होणार असल्याचे आश्वासन सचिवांकडून दिल्या जात आहे. यावर प्रत्यक्षरित्या किती कार्य होते व सदर समस्येपासून जनतेची मुक्तता होते अथवा नाही हे येत्या काळात कळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.