Take a fresh look at your lifestyle.

विप्रो कंपनीने तब्बल 300 कर्मचाऱ्यांना दिलं ‘नारळ’; शेअर बाजारात त्सुनामी येणार?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विप्रोने तब्बल 300 कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी पाठवले. कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी दावा केला आहे की, या 300 कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या एकात्मतेसोबत दगाफटका केला आहे. कामाच्या वेळेनंतर हे कर्मचारी इतर कंपन्यांमध्ये काम करायचे. अशा 300 कर्मचाऱ्यांवर कंपनीने कारवाई केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना कंपनीत स्थान नसल्याचे प्रेमजी म्हणाले. या कर्मचाऱ्यांमुळे कंपनीला धोका दिल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे या घटनेचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. शेअर बाजारात सध्या विप्रोचे शेअर्स घसरत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गौतम अदानी ‘मातोश्री’वर; राजकीय चर्चांना उधाण

Infosys Ltd आणि Tech Mahindra Ltd यासह प्रतिस्पर्धी आयटी कंपन्यांसाठी एकाच वेळी काम करत असल्याचे आढळून आल्यानंतर विप्रो लिमिटेडने तब्बल 300 कर्मचारी कामावरून काढून टाकले, त्या सर्वांचा तीन वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव होता. Infosysने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या कर्मचार्‍यांना ईमेलद्वारे अशा वर्तनाबद्दल चेतावणी दिली होती.

महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ED आणि NIAचे छापे; २० जणांना अटक

या सगळ्यानंतर आयटी कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारात पडतात की नाही. दीर्घ मुदतीसाठी हा शेअर खरेदी करायचा की नाही, हे पाहणेही आता महत्त्वाचे ठरणार आहे. आज शेअर 0.35 टक्क्यांनी घसरल्याचे दिसते. विप्रोचे शेअर बाजारात पुन्हा वाढतील का? याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.