Take a fresh look at your lifestyle.

पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पती अन् सासऱ्याची हत्या, त्यानंतर घटनास्थळीच…

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

झारखंड – झारखंडच्या जमशेदपूर शहरातून नुकतंच एक भयंकर प्रकरण समोर आलं आहे. येथील एका महिलेला पतीने तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. अतिशय घृणास्पद बाब म्हणजे त्या जागीच महिलेनं प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार इथेच थांबला नाही. त्यानंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या सासऱ्याचीही दोघांनी हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जमशेदपूर येथील बागबेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांना शुक्रवारी बाप लेकांचे मृतदेह घरातील दोन वेगवेगळ्या खोलीत आढळून आले आहे. सुशील मोहंती (वय 70 वर्ष) आणि राजू मोहंती (वय 40 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

दरम्यान, ही घटना घडताच अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देतांना सांगितलं की, तपासादरम्यान त्यांना आरोपी महिलेच्या पतीच्या मानेवर खुणा आढळल्या. त्यानंतर त्यांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने प्रियकराच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपी महिलेचा पती राजू याला आपल्या पत्नीवर आधीपासूनच संशय होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याने पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर तिघांमध्ये वाद सुरू झाला. यात पत्नी आणि तिच्या प्रियकराने आधी राजूचा खून केला, त्यानंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या राजूच्या वडिलांचा गळा दाबून हत्या केली. दुहेरी हत्याकांड केल्यानंतर दोघांनी घटनास्थळीच शारीरिक संबंध ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.