Take a fresh look at your lifestyle.

महिलांनी आयुष्यात आलेल्या संकटांना खंबीरपणे सामोरे जावे : मुनोत

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : महिलांनी आयुष्यात आलेल्या अडचणी व संकटांना खंबीरपणे सामोरे जावे, संकट निश्चितच टळण्यास मदत होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ महिला पत्रकार व नगर मर्चन्टस् बॅंकेच्या माजी अध्यक्षा मीनाताई मुनोत यांनी केले.

जैन समाजातील आदर्श जैन महिला मंडळाने जैन स्थानकमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकारिता, बॅंकींग व आरोग्य या विषयावर आयोजित व्याख्यानात मुनोत बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली गांधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगिता
ललित कोठारी होत्या.

यावेळी मुनोत म्हणाल्या, महिलांनी व्यापारात भाग घेऊन बॅंकींग व्यवहार शिकावे. त्यासाठी आवश्यक ज्ञान अवगत करावे. ही काळाची गरज असून, प्रपंच व सामाजिक कार्य करताना स्वतःचे आरोग्य सांभाळावे, असे आवाहन केले. वैशाली गांधी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, दैनंदिन जीवनात आरोग्यास चांगले व हानीकारक नसणारे पदार्थ खावेत. आजकाल इन्सटन्टचे पॅकेट, फास्ट फुड, चायनीज खाण्याचे प्रमाण वाढले असून ते दररोज खाणे अपायकारक आहे. अंगणवाडी, हॉटेल्स व सार्वजनिक कार्यक्रम स्थळी आचारी आपले काम स्वच्छतापूर्वक करतात की नाही यासाठी महिलांनी हायजीन फर्स्ट ग्रुप स्थापन करावा असे सांगितले.

यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष राणी बाबेल यांनी स्वागतपर भाषण केले. सुत्रसंचालन विद्या श्रेणिक धाडीवाल, रंजना सुनिल चोरडिया यांनी केले. अनुपमा रुणवाल, सुरेखा सुराणा, भारती चोरडिया, महिला मंडळाच्या कार्यकारणी सदस्या व सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.