Take a fresh look at your lifestyle.

आता तुम्हालाही मिळेल ५००० रुपये पर्यंत पेन्शन; या योजनेचे ४ कोटी सदस्य पूर्ण

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक नवनवीन योजना आणल्या. त्यापैकी एक म्हणजे अटल पेन्शन योजना. केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेपैकी एक असलेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) कमी काळातच खूप लोकप्रिय झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षापर्यंत 4 कोटीपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स या योजनेशी जोडले गेले आहेत. यावरून या योजनेच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. शिवाय 4 कोटींपैकी 99 लाख जण केवळ 2021-22 या आर्थिक वर्षात जोडले गेले आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने (PFRDA) 21 एप्रिल 2022 रोजी ही माहिती दिली आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नवीन ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी ९०% अनुदान योजना सुरु; असा करा अर्ज

PFRDA ने दिलेल्या माहितीनुसार, अटल पेन्शन योजनेच्या सबस्क्रायबर्सची संख्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 4.01 कोटी एवढी होती. APY अंतर्गत सदस्यत्व घेतलेल्या व्यक्तींपैकी 44 टक्के महिला आहेत. या व्यतिरिक्त, मोठ्या संख्येने तरुण या योजनेत सहभागी होत आहेत. पेन्शन फंड नियामकाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 45 टक्के एपीवाय सदस्य हे 18-25 वर्षं वयोगटातले आहेत.

आता ‘हे’ Apps वापरा आणि अगदी स्वस्तात मिळवा पेट्रोल-डिझेल! वाचा सविस्तर

पेन्शन फंड रेग्युलेटरच्या मते, एपीवायच्या यशामागे सर्व श्रेणीतल्या बँकांची सक्रिय भागीदारी हे मुख्य कारण आहे. APY अंतर्गत, 71 टक्के नावनोंदणी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये (PSBs), 19 टक्के नोंदणी प्रादेशिक बँकांमध्ये (RRBs), 6 टक्के नोंदणी खासगी क्षेत्रातल्या बँकांमध्ये आणि 3 टक्के नोंदणी पेमेंट आणि स्मॉल फायनान्स बँकांमार्फत (SFBs) झाली होती. APY योजनेच्या माध्यमातून वृद्धापकाळात जास्तीत जास्त 5 हजार रुपये आणि किमान 1000 रुपये पेन्शन मिळू शकते. PFRDA नुसार, सुमारे 80 टक्के ग्राहकांनी एक हजार रुपयांच्या पेन्शन योजनेच्या प्लॅनची निवड केली असून, 13 टक्के जणांनी पाच हजार रुपयांच्या पेन्शन योजनेची निवड केली आहे.

सुवर्णसंधी! आता थेट मुलाखतीद्वारे मिळणार बँकेत मोठ्या पगाराची नोकरी! आताच करा अर्ज

भारत सरकारने ही योजना 9 मे 2015 रोजी सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणून सुरू केली. या योजनेत ज्यांचं बचत खातं कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे, असे 18-40 वर्षं वयोगटातले सर्व भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत पाच प्लॅन्स आहेत. 1 हजार रुपये, 2 हजार रुपये, 3 हजार रुपये, 4 हजार रुपये आणि 5 हजार रुपये यांपैकी तुमच्या आवडीचा कोणताही प्लॅन तुम्ही निवडू शकता.

दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

वयाची 60 वर्षं पूर्ण झाल्यावर ग्राहकाने निवडलेल्या पेन्शन स्लॅबनुसार त्याला पेन्शन दिलं जातं. योजनेदरम्यान पेन्शन स्लॅबमध्येही बदल केले जाऊ शकतात. शिवाय या योजनेच्या लाभार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला पेन्शनची रक्कम दिली जाते. परंतु या योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षं गुंतवणूक करावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.